व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे हवेत ! – कवी कुमार विश्‍वास यांचे परखड मत

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भाषणात अनेक ‘इंग्रजी’ शब्‍द वापरले. ‘सर्टिफिकेट’, ‘इंजिनिअरिंग’, ‘आयकॉनिक’, ‘लायब्ररी’, असे म्‍हणत मराठीचे महत्त्व त्‍यांनी सांगितले.

ग्रंथालय चळवळीला सरकारकडून आर्थिक साहाय्‍याची अपेक्षा ! – डॉ. गजानन कोटेवार, अध्‍यक्ष, राज्‍य ग्रंथालय संघ

साहित्‍य संमेलनामध्‍ये ग्रंथपालाला प्रतिष्‍ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्‍य पुरस्‍कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्‍यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.

ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक ! – डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा आहेत. त्यांनी मराठीला साहित्याचा अमर ठेवा दिला. अन्य साहित्य आज आहे; पण काही दशकांनी वाचलेही जाणार नाही. या तिघांचे साहित्य मात्र कायम वाचले जाईल. त्या अनुषंगाने आळंदी, देहू आणि वर्धा ही साहित्यिकांची … Read more

मराठी भाषेच्‍या समृद्धीसाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठी साहित्‍यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्‍य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्‍यिकांच्‍या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.

वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !

९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्‍यात आले.

साहित्‍याचा संसार सरकारच्‍या कह्यात जाऊ नये, याचे भान राखा !

संमेलनाध्‍यक्ष निवृत्त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्‍य संस्‍था आणि साहित्‍यिक यांना सुनावले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवाद्यांकडून गोंधळ !

मराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी !

‘मराठी’चा जागर अपेक्षित !

संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण !

वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनातील भव्‍यता ‘न भूतो न भविष्‍यति’ ठरणारी  !

७ सहस्र ५०० आसंद्यांची व्‍यवस्‍था असणारे असे ५ सभामंडप सिद्ध !