भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून महाविकास आघाडीच्या आमदारांची विधीमंडळाच्या पायर्‍यांवर निदर्शने !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून आक्रमक होत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ३ जुलै या दिवशी आंदोलन केले. या वेळी ‘कुणी निंदा कुणी वंदा, भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा’, अशी घोषणा देण्यात ली. विरोधकांनी हातात विविध मागण्यांचे फलक धरले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी ही निदर्शने केली.