कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी रुपय निधीची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली आहे. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामास गती येईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव यांनी दिली.
जयश्री जाधव पुढे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या पर्यटन आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्यास निधी संमत होण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता, तसेच गत अधिवेशन काळातही लक्ष वेधले होते. त्यामुळे चालू हिवाळी अधिवेशनात त्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.