बारामती येथील गुन्हेशोध पथकाकडून ११ आरोपींना अटक : १२ पिस्तुलांसह २० काडतुसे हस्तगत

मध्यप्रदेशमधून पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणारी यंत्रणा उघडकीस

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

भारताला सुराज्याकडे नेण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये प्रबोधन अन् प्रशासनाला निवेदन

येथील बीएस्एस् महिला उच्च विद्यालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर प्रबोधन केले.

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देणे, विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि ध्वजसंकलन अभियान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तर भारतात शीतलहर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत शीतलहर आल्याचे दिसून येत आहे. येथे बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हिमाचल प्रदेशात कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला.

पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.

३७० कलम हटवल्याने जम्मू-काश्मीरमधील पीडित लोकांना घटनात्मक अधिकार मिळाले ! – जस्टीस डिलेड बट डिलिव्हर्डचे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह

३७० कलम हटवल्याने येथील दलित, महिला, गुरखा, पश्‍चिम पाकिस्तानमधील निर्वासित आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरितांना न्याय मिळाला आहे.