स्त्रीणामशिक्षितपटुत्वममानुषीषु संदृश्यते किमुत याः प्रतिबोधवत्यः । – कालिदास
(अभिज्ञानशाकुन्तल, अङ्क ५, श्लोक २२ )
अर्थ : मनुष्येतर प्राण्यात स्त्रियांमध्ये न शिकताच चातुर्य दिसून येते, तर ज्यांना शिक्षण मिळाले आहे, अशा स्त्रियांविषयी काय बोलावे ?
स्त्रियांमध्ये निसर्गतःच पांडित्य असणे
स्त्रियो हि नाम खल्वेता निसर्गादेव पण्डिताः ।
पुरुषाणां तु पाण्डित्यं शास्रैरेवोपदिश्यते ॥
– शूद्रक (मृच्छकटिक, अङ्क ४, श्लोक १९)
अर्थ : स्त्रिया खरोखर निसर्गतःच पंडित असतात. पुरुषांना मात्र शास्त्राचा अभ्यास करून पांडित्य मिळवावे लागते.
स्त्रियांची पूजा केली जात असलेल्या ठिकाणी देवतांनी रममाण होणे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥
– मनुस्मृति अध्याय ३, श्लोक ५६
अर्थ : जेथे स्त्रीचे (सर्वार्थाने) पूजन होते, तेथेच देवतागण संतोषाने आणि प्रसन्नतेने रहातात. ज्या घरात स्त्रियांची अवहेलना होते, तेथील सर्व धर्मकृत्ये निष्फळ होतात.