संस्कृत भाषेचे सौंदर्य

बुद्धीमान आणि बलशाली दुर्जन महाभयंकर असणे

दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालङ्कृतोऽपि सन् ।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ॥ – नीतीशतक, श्लोक ५३

अर्थ : विद्येने अलंकृत असलेला दुर्जनसुद्धा टाळावा; कारण ज्या सर्पाच्या डोक्यावर मणी आहे, तो अधिक भयंकर असतो. दुर्जन जर शिकलेला, बुद्धीमान अन् बलशाली असेल, तर तो महाभयंकर होतो.


विषारी प्राण्यापेक्षा दुर्जन अधिक विषारी असणे

वृश्चिकस्य विषं पृच्छे मक्षिकायाः मुखे विषम् ।
तक्षकस्य विषं दन्ते सर्वाङ्गे दुर्जनस्य तत् ॥

अर्थ : सापाच्या दातात, गांधील माशीच्या डोक्यात, विंचवाच्या नांगीत, तर दुर्जनाच्या सर्वांगात विष असते. म्हणजे कोणत्याही विषारी प्राण्यापेक्षा दुर्जन हा अधिक विषारी असतो.


दुष्ट लोक सर्पापेक्षा क्रूर असणे

सर्पः क्रूरः खलः क्रूरः सर्पात् क्रूरतरः खलः ।
मन्त्रौषधिवशः सर्पः खलः केन निवार्यते ॥ – नीतीशतक, श्लोक ५

अर्थ : सर्प अन् दुष्ट दोन्ही क्रूर आहेत. सापापेक्षा दुष्ट अधिक क्रूर आहेत; कारण क्रूर साप मंत्राने तरी शांत होतो; पण दुष्ट कोणत्याही मंत्राने शांत होत नाही.