संस्कृत भाषेचे सौंदर्य

संसार तरून जाण्याचे भार्या हे उत्तम साधन असणे

अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतम: सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मित्रं मरिष्यत: ॥

– महाभारत, आदिपर्व, अध्याय ६८, श्लोक ४०

अर्थ : स्त्री हे पुरुषाचे अर्धे शरीर आहे. पत्नीसारखा दुसरा जीवलग सखा नाही. स्त्रीमुळे धर्म, अर्थ आणि काम साधतात. मरणार्‍यालाही स्त्री हीच मित्र असते.


गृहिणीविना घर हे अरण्यासमान भासणे

न गृहं गृहमित्याहुः गृहिणी गृहमुच्यते ।
गृहं हि गृहिणीहीनम् अरण्यसदृशं मतम् ॥

– पंचतंत्र, तंत्र ३, गोष्ट ३९, सुभाषित २

अर्थ : नुसते घर हे ‘घर’ नसून, गृहिणी हेच खरे घर मानले जाते. गृहिणीविना जे घर, ते अरण्यवत समजावे.


हिंदु धर्मात माता आणि मातृभूमी यांना स्वर्गापेक्षा महान स्थान असणे

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

अर्थ : लक्ष्मणा, लंका सोन्याची जरी असली तरी मला तिच्याविषयी प्रेम नाही. आई आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही थोर वाटतात.

(मातेचे महत्त्व स्वर्गापेक्षा महान लेखणार्‍या हिंदु धर्माला स्त्रीविरोधी समजणे म्हणजे पुरोगामित्व का ? – संपादक)