छत्रपती संभाजीनगर येथे उर्दू घराचे बांधकाम होणार !

राज्यातील अन्यही मुसलमानबहुल शहरांमध्ये उर्दू घरे होण्याची शक्यता !

उर्दू घर

मुंबई – उर्दू भाषेच्याxz  विकासासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत या उर्दू घराचे बांधकाम करण्यात येत आहे. भविष्यात राज्यातील अन्य मुसलमानबहुल शहरांमध्येही उर्दू घरे उभारली जाण्याची शक्यता आहे. या उर्दू घरांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात सरकारकडून १२ कोटी १४ लाख ५६ सहस्र रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. २ सहस्र ५११.४२ चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर उर्दू घर उभारण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात नांदेड, नागपूर, सोलापूर, मालेगाव या जिल्ह्यांत उर्दू घरे बांधण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील प्रस्तावित उर्दू घर हे राज्यातील ५ वे उर्दू घर ठरणार आहे. नांदेड येथे काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आलिशान उर्दू घरामध्ये मद्य पिणे, जुगार खेळणे आदी अपप्रकार झाल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथील उर्दू घर काही काळ बंद ठेवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

मराठी मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रात उर्दू भाषेचे उदात्तीकरण कशासाठी ?