कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गडहिंग्‍लज येथे आज ‘श्री महालक्ष्मी यात्रा समिती’च्‍या वतीने श्री महालक्ष्मीदेवीची नगरप्रदक्षिणा !

श्री महालक्ष्मी यात्रा समिती’ गडहिंग्‍लजच्‍या वतीने सोमवार, ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता श्री महालक्ष्मीदेवीची चांदीची पालखी आणि कळस यांची हिरण्‍यकेशी नदीघाटापासून मंगलकलश अन् सवाद्य मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा होणार आहे

महाराष्‍ट्रातून मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !

१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्‍याचे राज्‍यातील प्रमाण धक्‍कादायक आहे. मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली म्‍हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्‍या आहेत.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

हेर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने पाडले !

हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने २ मे या दिवशी पाडले. हे प्रार्थनास्थळ अनधिकृत होते, तसेच ते पूर्ण झालेले नव्हते; मात्र त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

जिल्‍ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्‍या कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्‍थिती नोंदवण्‍यासाठी ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍थाच नाही !

कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या तुलनेत सांगली महापालिकेसारख्‍या तुलतेन अत्‍यंत लहान असलेल्‍या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍था आहे, इतकेच नाही, तर प्रत्‍येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.

राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, फेरी, निवेदन !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मंदिरांमध्ये साकडे आणि मंदिर स्वच्छता !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये साकडे घालण्यात येत आहे, मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

आत्‍मनिर्भर आणि स्‍वावलंबी भारतासाठी ‘सहकार भारती’ने पुढाकार घ्‍यावा ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामी

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ विविध क्षेत्रांत अनेक संस्‍था, संघटना यांच्‍या माध्‍यमातून सामाजिक कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करत आहे. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ अपकीर्त झाली.

जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मेला पाणीपुरवठा होणार नाही !

जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ मे या दिवशी अपुरा पाणीपुरवठा होईल.