कोल्हापूर येथील पंचगंगेमध्ये ४ महिलांना बुडतांना जीवरक्षकांनी वाचवले  !

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या ४ महिला पंचगंगेत बुडत असतांना जीवरक्षकांनी सतर्कतेने वाचवल्याने अनर्थ टळला.

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’ची सुविधा उपलब्ध !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना मंदिराच्या परिसरात देवीचे दर्शन होण्यासाठी ‘एल्.ई.डी.टी.व्ही.’ बसवण्यात येणार आहेत.

‘एस्.टी.’चे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये !

बसप्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आणि उन्हाळ्यातील गर्दीचा हंगाम यांमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्हा एस्.टी.चे प्रतिदिन मे मधील सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये इतके आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा कळस आणि पालखी प्रदक्षिणा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासाठी भाविकांनी ३७ किलो चांदीची पालखी दिली आहे. याच समवेत मंदिराला नवीन कळस बसवण्यात येणार आहे.

नवे पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्‍याचा ठराव !

ग्रामसभेत चर्चा करून कोणत्‍याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्‍याचे विज्ञापन त्‍यांच्‍या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची अपकीर्ती आणि बजरंग दलाचा अवमान यांच्‍या निषेधार्थ आंदोलन !

आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महापुरुष यांचा जाणीवपूर्वक अवमान आणि हेतू:पुरस्‍सर अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्‍वीकारले.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड !

येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.

खासगी शिकवणी घेणार्‍यांच्या विरोधात ‘दुहेरी शिक्षकविरोधी लढा कृती समिती’ याचिका प्रविष्ट करणार !

कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जे शिक्षक कार्यरत आहेत, ते सेवा-अटी यांचा भंग करून खासगी शिकवण्या घेतात. शासनाचा २६ एप्रिल २००० च्या परिपत्रकानुसार शाळेत शिकवणार्‍या शिक्षकास खासगी शिकवणी घेण्यास शासनाने अटकाव केला आहे.

कोल्हापूर येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘द केरल स्टोरी’चे विनामूल्य आयोजन !

प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे, सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

संयुक्त शाहूपुरीच्या वतीने भव्य छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन !

प्रथमच शाहूपुरीतील ४५ मंडळांना एकत्र करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी परिसरातील अनेक मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे.