हेर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने पाडले !

प्रशासनाने अनधिकृत प्रार्थनास्थळावर केलेली कारवाई

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने २ मे या दिवशी पाडले. हे प्रार्थनास्थळ अनधिकृत होते, तसेच ते पूर्ण झालेले नव्हते; मात्र त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. सकाळपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात आले.

हेर्ले या गावात संजयनगर भागात शिवजयंतीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकाची अज्ञातांनी विटंबना केली होती. या प्रकरणी गावातील नागरिक, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायतीवर संबंधितांवर कारवाईसाठी मोर्चा काढला होता. याचे पडसाद संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उमटले होते आणि अनेक गावांमध्ये बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता.