श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’ची सुविधा उपलब्ध !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ‘एल्.ई.डी.टी.व्ही.’च्या सुविधेचा प्रारंभ करतांना विविध मान्यवर

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना मंदिराच्या परिसरात देवीचे दर्शन होण्यासाठी ‘एल्.ई.डी.टी.व्ही.’ बसवण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातील पहिल्या ५५ इंच उंचीच्या ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’चे पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. या टीव्हीमुळे भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे थेट दर्शन होणार आहे. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.