पोलादनिर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र येथील कार्यालयांवर आयकर खात्याच्या धाडी बेहिशोबी मालमत्ता कह्यात

आयकर खात्याने एका प्रथितयश पोलाद (स्टील) निर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील कार्यालयांवर धाडी टाकून सुमारे १७५ कोटी ५० लक्ष रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता कह्यात घेतली आहे.

आयकर विभागाकडून पी.एफ्.आय.ची नोंदणी रहित !

पी.एफ्.आय.च्या राष्ट्रघातकी आणि धर्मद्वेषी कारवाया पहाता तिच्यावर केंद्र सरकारने बंदी घालणेच अपेक्षित आहे !

अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या वाहनचालकाच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये सापडले १ कोटी रुपये !

तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे आमदार आर्. चंद्रशेखर यांच्या वाहनचालकाच्या घरावर आयकर विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने धाड टाकून १ कोटी रुपये जप्त केले आहेत. अलगरासामी असे या चालकाचे नाव आहे.

१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे धाडसत्र

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या विरोधात आयकर विभागाने ३ मार्च या दिवशी धाडसत्र आरंभले. विभागाने त्या दोघांच्या मालमत्तांवर धाडी टाकत झाडाझडती चालू केली.

अभिनेता सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक

ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड  !

गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !

ख्रिस्ती धर्मप्रचारकाचे खरे स्वरूप जाणा !

तमिळनाडू राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये आयकर विभागाच्या सर्वांत मोठ्या धाडीतून १ सहस्र ७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली. २०० कर्मचारी ५ दिवस धाडीत सापडलेल्या सामानाचे मूल्यांकन करत होते.