अभिनेता सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक

अभिनेते, राज्यकर्ते किंवा उद्योजक प्रचंड मोठे भ्रष्टाचारी होईपर्यंत केलेल्या गुन्ह्यांमध्येच त्यांना पकडले का जात नाही ?

सचिन जोशी

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि उद्योजक सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक करण्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून सचिन जोशी यांचे १८ घंटे अन्वेषण करण्यात आले. सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस पाठवण्यात आली होती; मात्र ते उपस्थित राहिले नव्हते. सचिन जोशी याने देशातून पलायन केलला आरोपी विजय मल्ला यांचा गोवा येथील बंगला खरेदी केला होता. यासह अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि क्लब यांचे ते मालक आहेत. आयकर विभागानेही मागील आठवड्यात सचिन जोशी यांचे निवासस्थान आणि कार्यालय यांवर धाड टाकली होती.