आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यावरच मी पुराव्यानिशी बोलेन ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मी कुठेही पळून जाणार नाही, तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. यासंदर्भात मला कोणतीही सूचना, नोटीस आलेली नाही. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी संपली की, मी पुराव्यानिशी बोलेन’, अशा शब्दांत आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.

धाड टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक !

आयकर विभागाने केलेल्या धाडसत्राच्या संदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आयकर विभागाची धाड

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे २५ हून अधिक अधिकारी त्यांच्या घरी आले; त्यांपैकी काही अधिकारी हे त्यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्या वेळी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

पोलादनिर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र येथील कार्यालयांवर आयकर खात्याच्या धाडी बेहिशोबी मालमत्ता कह्यात

आयकर खात्याने एका प्रथितयश पोलाद (स्टील) निर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील कार्यालयांवर धाडी टाकून सुमारे १७५ कोटी ५० लक्ष रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता कह्यात घेतली आहे.

आयकर विभागाकडून पी.एफ्.आय.ची नोंदणी रहित !

पी.एफ्.आय.च्या राष्ट्रघातकी आणि धर्मद्वेषी कारवाया पहाता तिच्यावर केंद्र सरकारने बंदी घालणेच अपेक्षित आहे !

अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या वाहनचालकाच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये सापडले १ कोटी रुपये !

तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे आमदार आर्. चंद्रशेखर यांच्या वाहनचालकाच्या घरावर आयकर विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने धाड टाकून १ कोटी रुपये जप्त केले आहेत. अलगरासामी असे या चालकाचे नाव आहे.

१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे धाडसत्र

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या विरोधात आयकर विभागाने ३ मार्च या दिवशी धाडसत्र आरंभले. विभागाने त्या दोघांच्या मालमत्तांवर धाडी टाकत झाडाझडती चालू केली.

अभिनेता सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक

ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड  !

गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.