आयकर विभागाकडून पी.एफ्.आय.ची नोंदणी रहित !

‘ईडी’कडून देशभरात २६ ठिकाणी पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी !

पी.एफ्.आय.च्या राष्ट्रघातकी आणि धर्मद्वेषी कारवाया पहाता तिच्यावर केंद्र सरकारने बंदी घालणेच अपेक्षित आहे !

पी.एफ्.आय.

नवी देहली – आयकर विभागाने जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची (‘पी.एफ्.आय.’ची) नोंदणी रहित केली आहे. कलम १२ अ (३) अंतर्गत एखादी संस्था किंवा न्यास कार्य करत नसेल, तर त्यांची नोंदणी रहित करता येऊ शकते. पी.एफ्.आय.वर गेल्या वर्षी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाला अर्थपुरवठा केल्याचा आरोप आहे.

१. दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) विशेष न्यायालयात सांगितले की, पी.एफ्.आय.ने केरळमध्ये आतंकवादी केंद्रे स्थापन करण्यासाठी पैसे गोळा केले आहेत. याचा वापर देशातील सामाजिक शांतता भंग करण्यासाठी करण्यात येत आहे. पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांच्या पडताळणीनंतर ही गोष्ट समोर आली आहे.

२. पी.एफ्.आय.कडून जिहादी केंद्रे चालवण्यात येत होते. तेथे अन्वेषण यंत्रणांकडून १४ जून या दिवशी धाडी घालण्यात आल्या. ही केंद्रे केरळमधील कोल्लमच्या जंगलात होती. येथे डिटोनेटर आणि आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे.

३. १५ जून या दिवशी ईडीने देशातील उत्तरप्रदेश, देहली, बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ येथील २६ ठिकाणी धाडी घातल्या. यात पी.एफ्.आय.चा अध्यक्ष अब्दुल सलाम याचे थिरूवनंतपूरम् आणि कोची येथील घरांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारावरून या धाडी घालण्यात आल्या.