रुग्णसेवा नाकारल्यास खासगी रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.

पुणे येथील पहिले कोरोनाबाधित दांपत्य ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडले

कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.

‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या दारावर महापालिका पत्रक लावणार

‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने कोरोना रोखण्यासाठी उचलेली कठोर पावले योग्यच ! – मायकल जे रेयान, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले कठोर असली, तरीही ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयान यांनी कौतुक म्हणून केले आहे……

ईश्‍वरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण

शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली…

मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास आदींसह सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, एस्.टी. महामंडळाच्या सर्व बसगाड्या यांसह सर्व शासकीय कार्यालये यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती………….

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.