मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास आदींसह सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण होणार

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, एस्.टी. महामंडळाच्या सर्व बसगाड्या यांसह सर्व शासकीय कार्यालये यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली. यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.