विश्‍वव्यापी गंगा

‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक

प.पू. भास्करकाका यांच्या गुरुनिष्ठेची काही उदाहरणे

प.पू. भास्करकाका पाचगणी (जिल्हा सातारा) येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची भेट झाल्यानंतरही काही दिवस प.पू. काका महाविद्यालयामध्ये शिकवत होते. गुरुमहाराज (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी) त्या कालावधीत पाचगणी येथे वास्तव्यास होते.

सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !

सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही.

परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी

कोटी कोटी प्रणाम !

• गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज पुण्यतिथी
• केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीचा जत्रोत्सव !
• मूठवाडी, उभादांडा (वेंगुर्ला) येथील श्री केपादेवीचा जत्रोत्सव !
• कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव

सनातन धर्ममार्ग जर सुव्यवस्थित राहिला, तरच जग तरेल !

‘‘आमच्या आचारनिष्ठांची, आमच्या श्रुतिस्मृति, देवदेवता, पुराणांची, गो-ब्राह्मणांदींची, तीर्थक्षेत्रांची, विभूतीची, मंदिराची निखंदना (विडंबना) सहन करणार नाही. ज्यांना हे सहन होते, त्यांची निष्ठा आणि भक्ती हे ढोंग आहे. दंभ आहे. ही षंढता आहे. परमात्मा त्याचा धिक्कार करतो. परमात्म्याला वीर भक्ती आवडते.’’

मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.

पाश्‍चात्त्यांची क्षणभंगूर टिकणारी मानसिकता !

हे पाश्‍चात्य मूर्ख, दोन दिवस ही एखादी धारणा आदर्श अशी धरून ठेवू शकत नाहीत. परस्परांची हजामत करतात आणि सोडून देतात. एखाद्या पतंगासारखे यांचे भंगूर जीवन ! यांचे सिद्धांत बुडबुड्यासारखे उत्पन्न होतात आणि बुडबुड्यात त्यांचा लय होतो . . . तोपर्यंत आम्ही तुम्हाला टारगट पोरच समजू. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी

नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.

वैदिक संस्कृतीचा द्वेष आणि तिला नामशेष करण्याचे षड्यंत्र !

वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिश्‍चन वळण लागावे, अशी उत्कटता आहे . . . आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्‍वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी