२४ डिसेंबर २०२० या दिवशी गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी, नगर यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने…
‘यत्नांची (प्रयत्नांची) शिकस्त करा आणि हा वैदिक मार्ग स्थापित करा. हा सनातन धर्ममार्ग जर सुव्यवस्थित राहील, तरच जग तरू शकेल. अंगात सामर्थ्य असून जर मोहाने या वैदिक मार्गाची स्थापना करण्यास कुणी माघार घेईल, तर त्याला पातक लागेल आणि ज्याच्या अंगात हा वैदिक सनातन धर्म प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य नाही, त्याने श्रद्धेने हे काम चालू केल्यास तो पापापासून मुक्त होऊन ज्ञानवान होईल.’
परमात्म्याला वीर भक्ती आवडते !
‘‘आमच्या आचारनिष्ठांची, आमच्या श्रुतिस्मृति, देवदेवता, पुराणांची, गो-ब्राह्मणांदींची, तीर्थक्षेत्रांची, विभूतीची, मंदिराची निखंदना (विडंबना) सहन करणार नाही. ज्यांना हे सहन होते, त्यांची निष्ठा आणि भक्ती हे ढोंग आहे. दंभ आहे. ही षंढता आहे. परमात्मा त्याचा धिक्कार करतो. परमात्म्याला वीर भक्ती आवडते.’’
– गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी
(मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)