विज्ञानाधारित शेतीचे रूप निसर्गविरोधी !
अन्नधान्य अधिकाधिक वाढवणे हेच उद्दिष्ट झाल्याने रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा विलक्षण वापर होऊ लागला. पाणी आणि वनस्पती यांवर त्याचे भयंकर दुष्परिणाम झाले. कीटकनाशके आणि रासायनिक खते हा मोठा शाप ठरला. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या.