पाश्‍चात्त्यांची क्षणभंगूर टिकणारी मानसिकता !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

हे पाश्‍चात्य मूर्ख, दोन दिवस ही एखादी धारणा आदर्श अशी धरून ठेवू शकत नाहीत. परस्परांची हजामत करतात आणि सोडून देतात. एखाद्या पतंगासारखे यांचे भंगूर जीवन ! यांचे सिद्धांत बुडबुड्यासारखे उत्पन्न होतात आणि बुडबुड्यात त्यांचा लय होतो. किमान २०० ते ३०० वर्षे टिकेल, अशी समाजव्यवस्था सिद्ध करून दाखवा. मग आमच्याशी संवाद करण्याची योग्यता तुम्हाला लाभेल. तोपर्यंत आम्ही तुम्हाला टारगट पोरच समजू.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)