‘सर्वांना सुख लाभावे, अशी इच्छा करणे’, हीच दया !

या भूमीवर सर्वांनी सुखी असावे. सर्वांनी रोग, आपत्ती रहित असावे. शुभदायक, कल्याणकारक आणि मंगल अशा घटना सर्वांना अनुभवता याव्यात. कुणाच्याही वाट्याला कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे !

जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे.

भारतीय संस्कृतीतील स्त्री-जीवन !

२९ जुलैला ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार’, ‘विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना’ आणि ‘स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग . . .

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची ‘अभंगवाणी’ !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत…

व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?

गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.

नामजपाचे महत्त्व

ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…