स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही. त्याचे मन मुक्त झालेले असते आणि केवळ असाच मनुष्य यथार्थ जीवन जगण्यास योग्य असतो.

कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नका. शरिराला आणि इंद्रियांना कार्य करू द्या. सतत कर्म करत रहा; पण मनाला कोणत्याही वृत्तीच्या वा विकाराच्या आहारी जाऊ देऊ नका.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)