देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण अन् रूप मिळेल; पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे श्रेष्ठ साधन आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे, त्यातच जीवनातील सर्व सुख सामावले आहे.
नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही, तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फेसबुक)