परमार्थ तत्त्वाचा यथार्थ बोध होणे म्हणजे ज्ञान !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : किं ज्ञानं प्रोच्यते ?

अर्थ : ज्ञान कशाला म्हणावे ?

उत्तर : ज्ञानं तत्त्वार्थसंबोधः ।

अर्थ : तत्त्वाचा जो अर्थ आहे, त्याचा बोध होणे, म्हणजे ज्ञान !

तत्त्व म्हणजे त्याचा तो पणा, ‘असण्या’चा असणेपणा, ‘सत्’चे सत्त्त्व, परमार्थ अर्थात् आपल्या दृष्टीने ब्रह्म किंवा ईश्वर हे तत्त्व, यांचे जसेच्या तसे आकलन होणे, म्हणजे तत्त्वार्थ संबोध. असा ‘परमार्थ तत्त्वाचा यथार्थ बोध होणे, यालाच ज्ञान’, असे म्हणतात. या परमार्थाच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त इतर सर्वज्ञानाला संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी मोराच्या पिसाच्यावर दिसणार्‍या डोळ्यांची उपमा दिली आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)