प्रेमळपणा या गुणामुळे रामनाथी आश्रमातील वैद्य साधकांचे आधारस्तंभ ठरलेले पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

सनातनचे संत पू. (कै.) वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. ते पुष्कळ नामांकित वैद्य होते. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन, त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

विनम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अखंड भावावस्थेत रहाणारे सनातनचे २३ वे व्यष्टी संत पू. विनायक रघुनाथ कर्वेमामा (वय ८२ वर्षे) !

‘आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी (२४.१०.२०२१) या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कृतीतून शिकायला मिळालेली सूत्रे त्यांच्या चरणी समर्पित करते.

सनातनची नूतन प्रकाशने !

सनातनच्या ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र’ या मालिकेतील प्रथम ग्रंथ !
पू. अनंत आठवले यांचे चरित्र.

ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले सुप्रसिद्ध बासरीवादक पुणे येथील पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

सुरांमधून देवाची प्राप्ती होण्यासाठी ‘ईश्वरासाठीच करत आहे’, असा भाव ठेवून सूर आळवायला हवेत, तरच आपण परमेश्वरप्राप्ती साध्य करू शकतो. नाहीतर शेवटी ‘नरजन्मा येऊन काय मिळवले ?’, असे वाटेल.

ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून ईश्वरप्राप्ती करून संतत्वाला पोचलेले प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, हे सर्व वाचकांना अभ्यासता यावे, यासाठी पू. पंडित केशव गिंडे यांचा साधनाप्रवास संवादरूपी लेखाद्वारे येथे दिला आहे. ‘हा लेख वाचून सर्व कलाकारांना साधनारत होण्याची प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

अहं अल्प असल्याने कर्तेपणा देवाकडे देऊन स्वतः नामानिराळे रहाणारे सनातनचे संत पू. (कै.) विनय भावे !

पू. विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. लांजा, रत्नागिरी येथील सौ. शालन शेट्ये यांना पू. भावेकाकांमधील गुणांचे घडलेले दर्शन प्रस्तुत लेखातून त्यांनी शब्दबद्ध केले आहे.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे देवद आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका (वय ७५ वर्षे)!

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. शिवाजी वटकरकाका यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सर्वांना आपलेसे करणारे कै. बंकटलाल मोदी आणि तीव्र तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी !

राजस्थान येथे प्रसाराच्या सेवेनिमित्त गेल्यावर श्री. आनंद जाखोटिया यांना मोदी कुटुंबियांसह रहाण्याची संधी मिळाल्याने त्यांच्याशी ओळख झाली. कै. बंकटलाल मोदी आणि त्यांची पत्नी पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातन संस्थेच्या ६३ व्या समष्टी संत) (वय ७१ वर्षे) यांची जी गुणवैशिष्ट्ये लक्षात आली, ती येथे दिली आहेत.

आनंदवर्धिनी आणि मुक्तीदायिनी आदिशक्तीचे रूप अन् साधकांचे आध्यात्मिक कवच असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुपरंपरा पुढे चालवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांचे सर्व त्रास दूर करणार्‍या आणि मुक्तीप्रदायिनी आहेत….

पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि केलेले सूक्ष्म परीक्षण !

सत्संगाला पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा हे उपस्थित होते. देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.