श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा जन्म झाला त्या दिवशी महालय अमावास्या (भाद्रपद अमावास्या) ही तिथी होती. सर्व अमावास्यांमध्ये ‘महालय अमावास्या’ श्रेष्ठ आहे; कारण या अमावास्येला पितरांना गती मिळते; म्हणून महालय अमावास्येला ‘सर्वपित्री अमावास्या’, असेही म्हटले आहे. सध्या पृथ्वीवरील जवळजवळ सर्वांनाच पितरांचा त्रास आहे. आम्हा साधकांचे पितृदोष दूर करण्यासाठी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हा साधकांकडून श्री दत्तात्रेयाची उपासना करवून घेतली आहे. ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रेय आपले पितृदोष दूर करतात, त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुपरंपरा पुढे चालवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांचे सर्व त्रास दूर करणार्या आणि मुक्तीप्रदायिनी आहेत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, म्हणजे ‘साधकांवर होणारी सर्व प्रकारची आध्यात्मिक आक्रमणे स्वतःवर झेलणारी साधकांची आध्यात्मिक ढाल आहेत. त्यांच्यासारख्या केवळ त्याच आहेत !’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.९.२०२१) |
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वैशिष्ट्ये !
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अगदी लहान समस्या सोडवण्यालाही महत्त्व देतात.
१ आ. कोणतीही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे : कुठलीही सेवा असो, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ती सेवा अत्यंत भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. त्या ती सेवा जीव ओतून करतात. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी त्या अविरत प्रयत्न करतात.
१ इ. ‘साधकांचा न्यूनतम वेळ आणि ऊर्जा वापरून त्यांच्या साधनेतील समस्या सोडवणे’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य आहे.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच सर्व साधकांना ईश्वराशी प्रेमाने जोडणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ! : आश्रमातील प्रत्येक साधक आश्रमाचा घटक आहे आणि तो महत्त्वपूर्णही आहे; कारण आश्रमातील साधक अन् आश्रमाचा केंद्रबिंदू असलेले गुरुदेव यांचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. ते नाते अध्यात्मातले असल्याने सूक्ष्म आहे. ‘आश्रमातील सर्व साधकांचे मन जपणे आणि त्यांना ईश्वरी प्रेमाच्या माळेत गुंफणे’, हे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केल्यानेच आम्ही सर्व साधक साधनेत टिकून आहोत. आता गुरुदेवांचे हे कार्य श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ करत आहेत.
१ उ. साधकांच्या समस्या सूक्ष्मातून जाणून त्यांना साहाय्य करणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एका पूजेला बसल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांनी एका साधकाला बोलावले आणि सांगितले, ‘‘अमुक साधकांना भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करा. ‘त्यांच्याकडे सर्व ठीक आहे ना ?’, हे जाणून घ्या. त्यांना ‘गुरुदेवांनी तुमची आठवण काढली आहे’, असे सांगा.’’ त्या साधकाला संपर्क केल्यावर कळले की, त्याला थोड्या वेळापूर्वी एक मोठ्या कौटुंबिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे तो साधक सनातनच्या तिन्ही गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) हाक मारत होता आणि त्या वेळी त्याला आश्रमातून भ्रमणभाष आल्यावर त्याची भावजागृती झाली. ‘श्री गुरु माझ्या पाठीशी आहेत’, ही त्याची श्रद्धा वाढली.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, म्हणजे चैतन्याचा एक स्रोत असणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे रामनाथी आश्रमातील अस्तित्व हा साधकांसाठी केवळ आधार नाही, तर तो चैतन्याचा एक स्रोत आहे. रामनाथी आश्रमातील त्यांचे अस्तित्व सर्व साधकांसाठी उत्साहवर्धक, आनंद आणि समाधान देणारे आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, म्हणजे श्री गुरूंनी साधकांना दिलेले आध्यात्मिक कवच असणे
एखादा किल्ला असो किंवा राज्य, राजधानी असो किंवा आपले शरीर असो, त्याचे प्रवेशद्वार सर्वांत महत्त्वाचे असते, तसेच त्याची तटबंदी फार महत्त्वाची असते. तटबंदी नाजूक असेल, तर शत्रूच्या आक्रमणाची भीती असतेच. अनिष्ट शक्ती सनातनचे सात्त्विक आश्रम आणि साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण करण्यासाठी सतत कार्यरत असतात. आजपर्यंत अनेक वेळा रामनाथी आश्रम आणि आश्रमातील साधक यांच्यावर अनिष्ट शक्तींनी आक्रमणे केली. त्या आक्रमणांची झळ साधकांपर्यंत पोचू न देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, म्हणजे श्री गुरूंनी साधकांना दिलेले आध्यात्मिक कवच आहे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, म्हणजे रामनाथी आश्रमासाठी श्री गुरूंनी सिद्ध केलेली आध्यात्मिक तटबंदी आहे. ते चैतन्याचे अग्निकवच आहे आणि श्रीविष्णूची सुरक्षारेखा आहे. ती ओलांडण्याचे अनिष्ट शक्तींचे धाडस होत नाही.
४. देवीचे एक रूप असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
अ. सप्तर्षी जीवनाडीपट्टीत महर्षींनी त्यांचा उल्लेख ‘श्रीसत्शक्ति’, ‘भूदेवी’, ‘श्री महालक्ष्मी’, ‘उत्तरापुत्री’ आणि ‘आदिशक्ति स्वरूपिणी’, असा केला आहे.
आ. साधकांच्या साधनेतील कोणत्याही समस्येचे निवारण करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांसाठी पुण्यप्रदायिनी आणि आनंदवर्धिनी आदिशक्तीचे रूप आहेत.
इ. गुरुदेवांच्या आश्रमात रहाणार्या सर्व साधकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी उपलब्ध करून देणार्या त्या अन्नपूर्णेश्वरी आणि मातृस्वरूपिणी आहेत.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत भेटायला गेल्यावर ‘भाव तेथे देव’, या उक्तीची प्रचीती येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असल्याने सर्व साधक त्यांना गुरुरूपात पहातात. गुरु नेहमी बिंब-प्रतिबिंब या न्यायाप्रमाणे वागतात. ज्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत जातांना मी ‘आई जगदंबेच्या गाभार्यात जात आहे’, असा भाव ठेवतो, त्या वेळी मला त्यांच्याकडून भरभरून चैतन्य मिळते. त्या मला काही प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्या प्रश्नांची उत्तरे देतो. त्या वेळी ‘मी दिलेली उत्तरे त्यांना अपेक्षित अशी असून त्यांनीच मला ती सुचवली आहेत’, असे मला जाणवते; मात्र ‘जेव्हा त्यांना भेटायला जातांना माझ्या मनात तसा भाव नसतो, तेव्हा समस्यांपुरते मर्यादित उपाय आणि मानसिक समाधान मिळते’, असे माझ्या लक्षात आले.
६. ध्यानी-मनी सदैव साधकांनाच स्मरणार्या जगदंबास्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
‘त्या जगदंबा आहेत’, हे सत्य आहे; मात्र ते साधकांच्या मनातील भावावर अवलंबून आहे. आपण जगदंबेची आठवण काढली नाही, तरीही जगदंबा आपली आठवण काढते, हेही तेवढेच सत्य आहे ! श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ध्यानी-मनी आणि जागृती-विश्रांती या सर्वांमध्ये सनातनचे सर्वत्रचे साधक वसलेले आहेत.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
साधकांच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करणार्या आणि साधकांच्या साधनेतील अडथळे दूर करून साधकांना गुरुचरणांकडे नेण्यासाठी अविश्रांत परिश्रम करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
‘गुरुदेवा, ‘तुम्ही आम्हा साधकांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या छत्रछायेत ठेवले आहे’, याकरता आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’, म्हणजे सृजन (उत्पत्ती), पालन, पोषण आणि समृद्धी प्रदान करणार्या जगन्माता आदिशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखेच आहे. अशा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी सनातनच्या सर्वत्रच्या साधकांचे कोटीशः नमन !
आम्हा सर्व साधकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यासारखा गुरुसेवेचा ध्यास आणि गुरुसेवा करण्याची तळमळ आमच्या मनामध्ये निर्माण होऊ दे अन् त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू, कर्नाटक. (२८.९.२०२१)
|