प्रशिक्षणार्थी पोलीस हवालदार अमेय वळवईकर पोलिसांच्या कह्यात !
पणजी, १७ जुलै (वार्ता.) – मेरशी येथे झालेल्या टोळीयुद्धात गुंड विशाल गोलतकर यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत हे प्रकरण धसास लावून या प्रकरणी ५ संशयित आणि १ एक अल्पवयीन यांना कह्यात घेतले आहे.
Vishal Golatkar Murder Case: गँगवारच्या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग!#CrimeAlert #GoaPolice #dainikgomantakhttps://t.co/s5krk1u0aO
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 18, 2023
संशयितांची पोलीस कोठडीत, तर अल्पवयिनाची ‘अपना घर’ या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. गुंड ‘कोब्रा’ उपाख्य साई आणि त्याचा साथीदार यांनी विशाल गोलतकर याची हत्या केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. या हत्येमध्ये वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारा अमेय वळवईकर याचा सहभाग असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस हवालदार अमेय वळवईकर याला कह्यात घेण्यात आले. (प्रशिक्षण घेतेवेळीच गुंडांशी संबंध असलेला प्रशिक्षणार्थी पोलीस सेवेत रूजू झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखू शकेल का ? – संपादक)