गोवा : सदानंद शेट तानावडे राज्यसभेचे खासदार घोषित

सदानंद शेट तानावडे यांचे अभिनंदन करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि इतर मंत्री

पणजी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना आज, १८ जुलै या दिवशी विधानसभा सचिवांनी गोव्यातील राज्यसभेचे खासदार म्हणून घोषित केले. राज्यसभेसाठी भाजपचे विधानसभेत बहुमत होते. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती.

१८ जुलैला औपचारिकरित्या त्यांचे खासदारपद घोषित करण्यात आले. या औपचारिक घोषणेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मंत्री यांनी सदानंद शेट तानावडे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.