गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी

मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.

गोवा : ३ अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राला १८ वेळा ‘बॅट’ने शरिरावर प्रहार करून केले घायाळ !

अमली पदार्थांच्या व्यसनाचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम ! आतातरी पोलीस आणि प्रशासन यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील भावी पिढीला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत !

शंखवाळ (गोवा) येथे वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांवर कारवाई करण्याची देवीच्या भक्तांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती चोरण्यात आल्यानंतर फादर केनित टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे दिली.

डिचोली (गोवा) येथे अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कारवाई : १० जण कह्यात

‘अशी कारवाई काही काळापुरती मर्यादित न रहाता ती कायमस्वरूपी व्हावी आणि अमली पदार्थांचे केवळ डिचोलीतूनच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातून उच्चाटन करावे’, अशा प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

कर्नाटकला कळसा प्रकल्पासाठी गोव्याची संमती घेणे बंधनकारक ! – देविदास पांगम, गोव्याचे महाधिवक्ता

याचबरोबर कर्नाटकला कळसा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाकडूनही अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक आहे !

गोव्यात विना क्रमांक (नंबर प्लेट नसलेल्या), तसेच अस्पष्ट वाहन नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांचा सुळसुळाट !

चौकाचौकांत आधुनिक यंत्रणा असूनही वाहतूक प्रशासन या संदर्भात कारवाई का करत नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

पोर्तुगीज काळात गोव्यात बळजोरीने धर्मांतर झाले ! – डॉ. भूषण भावे

‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ या पुस्तकातून मिळतो.’’

कळसा प्रकल्पाला वनक्षेत्राची भूमी देण्यास कर्नाटक सरकारची संमती

‘कर्नाटक नीरवरी निगम’ने कळसा नाल्यावर धरण प्रकल्प उभारणे, ‘पंप हाऊस’ बांधणे, वीज उपकेंद्र उभारणे, पाणी आणि वीजपुरवठा करण्यासाठी परिसरांत सुविधा उपलब्ध करणे, असा प्रस्ताव कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाकडे ठेवला होता.

गोवा : पेडणे विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) स्थगित !

पेडणे ‘झोनिंग प्लान’ला पेडणे तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे, तसेच ९ ऑक्टोबरपर्यंत आराखडा रहित न केल्यास जनआंदोलन छेडण्याची चेतावणी पेडणेवासियांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.