लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती

गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?

पुढील अधिवेशनापूर्वी १ सहस्र गावांमध्ये हनुमान चालिसा चालू करणार ! – कमलेश कटारिया, अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, संभाजीनगर

हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एकमेव उपाय आहे. ‘जागरूक आणि संघटित हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील, असे वक्तव्य संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष श्री. कमलेश कटारिया यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या या धर्मयुद्धात कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्यांची जातपात न पाहता निवडून देणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

येत्या निवडणुकीमध्ये  लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान

‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, …’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, की ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत !

गोवा : छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक

यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?

गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाईल ! – मुख्यमंत्री

या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये : सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! या प्रकल्पासाठी एकूण  ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात अन्‍य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्‍यात आला आहे. अधिवेशनाच्‍या पाचव्‍या दिवशी म्‍हणजे २० जून या दिवशी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी येथे देण्‍यात आली आहे.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा !- अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्‍ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्‍ती मिशनरी, साम्‍यवादी, प्रसारमाध्‍यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्‍यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्‍यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्‍ये योगी आदित्‍यनाथ देशविरोधी शक्‍तींच्‍या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत.