नरकासुर प्रतिमांच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण

ध्वनीप्रदूषण होत असल्याचे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? कुणाच्या तक्रारीसाठी का थांबावे लागते ? प्रशासनाची ही निष्क्रीयताच नव्हे, तर असंवेदनशीलता आहे !

फोंडा येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ. मंजुनाथ देसाई यांना श्रद्धांजली !

श्री. अजित केरकर म्हणाले, ‘‘डॉ. मंजुनाथ देसाई या देव माणसाची जागा आणखी कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करावे.’’

तामसुली, खांडोळा येथे गेली ४० वर्षे आदर्शरित्या साजरी केली जात आहे दीपावली !

गावातील पूर्वजांनी चालू केलेला हा कार्यक्रम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

‘माधवराव ढवळीकर ट्रस्ट’च्या वतीने उद्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ‘दीपोत्सव २०२१’ कार्यक्रम

‘दीपोत्सव २०२१’ या कार्यक्रमाला ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. या वेळी श्रीकृष्ण पूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरा केली जाणार आहे अशी माहिती श्री. मिथिल ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ‘चलो मडगाव’ या हाकेला प्रतिसाद देत दीड सहस्रांहून अधिक हिंदू गोव्यामध्ये एकवटले !

दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ‘चलो मडगाव’ अशी हाक समस्त हिंदूंना दिली होती.

नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य !

गोवा राज्य आर्थिक संकटात असतांना नरकासुराच्या प्रतिमांवर पैसा खर्च करणे; म्हणजे नरकासुराच्या प्रतिमेसमवेत तो पैसा जाळल्याप्रमाणेच आहे !

ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या अभिमानाचे प्रतीक ! – विजय सरदेसाई, आमदार

‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष हा तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही. लोकांना असे झालेले नको; मात्र निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना संघटित करणे आवश्यक आहे.

गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

(म्हणे) ‘आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थाने यांना मोठे महत्त्व असून परमेश्‍वराच्या आशीवार्दाने आणि दर्शनाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात होतात त्या वेळी गप्प बसणार्‍या केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना निवडणूक आली की, परमेश्‍वर का आठवतो ?

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी