विद्यार्थ्यांनो, अभिजात संगीत साधनेत रियाजाचे (सरावाचे) महत्त्व लक्षात घेऊन नियमितपणे रियाज करा !
सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रियाज करावा. आपले डोके चालवू नये; मात्र मनात शंका आल्यास गुरूंकडून तिचे समाधान अवश्य करून घ्यावे. ‘रियाज करोगे, तो राज करोगे’, असे संगीतातील महनीय मंडळींनी म्हटले आहे. ते सार्थच आहे.