ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी संगीतातील उपशास्त्रीय गायन प्रकारांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी संगीतातील उपशास्त्रीय गायन प्रकारांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी २४ आणि २५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदुस्थानी संगीतातील उपशास्त्रीय गायन प्रकार (शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे स्वरप्रधान असते, त्यात शब्दांना तेवढे महत्त्व नसते. याउलट उपशास्त्रीय संगीत शब्दप्रधान असते. त्यातून भाव-भावना व्यक्त करता येतात. – कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) सादर केले. या संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांवर करण्यात आला.

गायन सेवा सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस (उजवीकडे) आणि तबला वादन करतांना श्री. गिरीजय प्रभुदेसाई

१. ‘होरी’ या संगीत प्रकाराच्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

या संगीत प्रकाराच्या वेळी काही प्रमाणात सात्त्विकता जाणवली; परंतु त्यातून देवतांचे तत्त्व अल्प प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळे या संगीत प्रकाराच्या वेळी वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर अल्प प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले.

कु. मधुरा भोसले

२. ‘कजरी’ या संगीत प्रकाराच्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

हा गीताचा प्रकार संथ गतीने असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या काही साधिकांना तो ऐकतांना कंटाळवाणा वाटला. प्रत्यक्षात या गायनप्रकारातून सत्त्वप्रधान शक्ती आणि श्रीकृष्णाचे ५ टक्के इतके तत्त्व प्रक्षेपित झाल्यामुळे वाईट शक्तींना सूक्ष्मातून त्रास झाला.

३. ‘ठुमरी’ या संगीत प्रकाराच्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

या गाण्याच्या प्रकारातून काही प्रमाणात सात्त्विकता आणि तारक शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांना अल्प प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाला. त्यामुळे साधकांचा त्रास न्यून झाला आणि तारक शक्तीमुळे साधकांवरील त्रासदायक आवरण न्यून झाले.

कु. तेजल पात्रीकर

४. ‘चतुरंग’ या संगीत प्रकाराच्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

या गाण्याच्या प्रकारात काव्य (गाण्याचे शब्द), तबला किंवा मृदंग यांचे बोल, तराणा आणि सरगम (टीप) गायले जातात. या चारही प्रकारांचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

टीप – १. तराणा : या गायनप्रकारात अर्थपूर्ण काव्याचा वापर न होता ‘नादीर’, ‘तन’, ‘दिम्’, ‘तोम्’ अशा नादमधुर; परंतु अर्थहीन शब्दांचा वापर होतो. तराणा हा मध्य आणि द्रुत लयीत गातात.
२. सरगम : या रागाची कल्पना आणि चलन लक्षात येण्यासाठी एखाद्या रागात, तालात बसवलेल्या स्वररचनेस ‘सरगम गीत’ किंवा ‘स्वरमालिका’ असे म्हणतात. या गीतात केवळ स्वरच गायले जातात, शब्द येत नाहीत.

– कु. तेजल पात्रीकर

४ अ. काव्य (गाण्याचे शब्द) : यातून सगुण स्तरावरील तारक शक्तीचे वातावरणात प्रक्षेपण होते. त्यामुळे भावजागृती झाली.
४ आ. तबला किंवा मृदंग यांचे बोल : तबला किंवा मृदंग यांच्या बोलातून निर्गुण-सगुण स्तरावरील तारक-मारक शक्तीचे वायुमंडलात प्रक्षेपण झाले. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होण्यास साहाय्य झाले.
४ इ. तराणा : तराणामधून रागांशी साधर्म्य असणार्‍या लयबद्ध धुनीमधून सात्त्विक नाद वातावरणात प्रक्षेपित झाला. त्यामुळे वातावरणाची अधिक प्रमाणात शुद्धी झाली.
४ ई. सरगम : सरगम ऐकतांना भाव, चैतन्य आणि आनंद यांची संमिश्र अनुभूती आली.

वरील सूत्रांमुळे ‘चतुरंगा’तून (‘चतुरंग’ या संगीत प्रकारातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य वातावरणात प्रक्षेपित झाल्यामुळे ‘चतुरंग’ ऐकत असतांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्या वेळी शिवाचे त्रिशूळ वाईट शक्तींच्या दिशेने गेले आणि त्याने वाईट शक्तींवर आघात केला. प्रयोगाला उपस्थित असणार्‍या अनेक वाईट शक्तींना त्रास झाले.

या गाण्याच्या वेळी शिव ‘आनंदतांडव’ करत असल्याचे दृश्य दिसले. तेव्हा गंधर्वलोकातील राग-रागिण्या (टीप) पांढर्‍या शुभ्र वस्त्रांमध्ये कार्यक्रमस्थळी सात्त्विक नृत्य करत असल्याचे दृश्य दिसले. या नृत्याच्या वेळी पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता आणि शिवाप्रतीचा भावही जागृत होत होता.

(टीप : भारतीय शास्त्रीय संगीतात विविध राग आहेत. त्याप्रमाणे त्या रागाच्या वेगवेगळ्या रागिण्याही असतात. रागिणी ही स्त्रीवाचक असते, उदा. भैरव रागाची रागिणी भैरवी आहे. संगीतात रागांच्या परिवाराचे वर्णन केले आहे. ‘रागाला पत्नी, मुले इत्यादी असतात’, असे शास्त्रात सांगितले आहे. – कु. तेजल पात्रीकर)

५. उपशास्त्रीय संगीत प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास

५ अ. उपशास्त्रीय संगीत प्रकार, संबंधित राग, गाण्याचे बोल, सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि जागृत झालेला भाव

५ आ. उपशास्त्रीय प्रकारातील विविध गाण्यांशी संबंधित राग, कार्यरत झालेले देवतेचे तत्त्व, गाण्यातून प्रक्षेपित झालेली देवतेची शक्ती, जागृत झालेले कुंडलिनीचक्र, जागृत झालेली कुंडलिनीनाडी आणि सूक्ष्मातून कार्यरत झालेल्या नादलहरींचा स्पर्श

६. राग देसमल्हार

हा राग देस आणि गौडमल्हार या रागांचा संगम आहे. या रागात शृंगार रस ओतप्रोत भरलेला आहे.

६ अ. रागातील गाण्याचे बोल

देखो री मोरी आली बरखाकी ऋत ।
छायी घटा घनघोर, चहुओर चमके बिजलिया कोयल कूक ।।
कोयल शबद सुनाई, मोहे पीकी याद दिलाई ।। धृ. ।।

हे गीत श्रीकृष्णाला पहाण्यासाठी आतूर झालेल्या वृंदावनातील गोपींनी गायल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले.

६ आ. रागाची बंदिश गायल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : चारही प्रकारच्या संगीतातून श्रीकृष्णाची शक्ती वातावरणात प्रवाहित झाली आणि त्यातून आध्यात्मिक लाभ झाला.

७. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२१)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.