
कराड – अनंतचतुर्दशीनिमित्त येथील कृष्णा नदीच्या घाटावर प्रीतीसंगम बागेसमोर सलग ९ व्या वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९ घंटे चालू असलेला महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनुमाने ५५ सहस्रांहून अधिक श्री गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वर्ष २०१५ पासून कृष्णा नदीच्या घाटावर अनंतचतुर्दशीला रणजित पाटील आणि सचिन पाटील बंधूंकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. २८ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत महाप्रसादाला प्रारंभ झाला. नंतर सलग १९ घंटे महाप्रसाद चालू होता.
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
१ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागणारा ठाणे येथील कार्यालय अधीक्षक कह्यात