पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पी.एम्.पी.एम्.एल्.ला) श्री गणेशोत्सव काळात १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा २४ लाख रुपयांची भर पडली आहे. या काळामध्ये उपनगरातील नागरिकांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’च्या ६७२ अतिरिक्त बसगाड्या चालू करण्यात आल्या होत्या. ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’कडून शहरामध्ये १ सहस्र ६५० बसगाड्यांच्या माध्यमातून ३७१ मार्गांवर प्रवासी वाहतूक केली जाते. श्री गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही सेवा २४ घंटे ठेवण्यात आली होती.