कुराणातील आयाते हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

याचिकाकर्ते वसीम रिझवी यांना ५० सहस्र रुपयांचा दंड

याचिकाकर्ते वसीम रिझवी

नवी देहली – कुराणातून २६ आयाते हटवण्यासंबंधी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

‘या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे. ‘ही धादांत निरर्थक याचिका आहे’, असे न्यायालयाने नमूद केले. याचिका प्रविष्ट करून घेण्याआधी न्यायालयाने रिझवी यांना ‘खरंच याचिका प्रविष्ट करायची आहे का ?’ याची विचारणा केली होती. त्यावर याचिकाकर्त्याचे अधिवक्ता आर्.के. रायझादा यांनी होकार दिल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली.