नगर येथे विवाह सोहळ्यावर कारवाई करत वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

नगर, ३ मे – येथील भीस्तबाग चौक परिसरातील प्रशांत कॉलनी येथे २ मे या दिवशी सकाळी साडेदहा वाजता लोकांची गर्दी जमवून विवाह समारंभ होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी पथकासह पाहणी करत मुलीच्या घरी विवाह आयोजित केल्याने वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. विवाह समारंभास ५० ते ६० नागरिक उपस्थित होते.