वेब सिरीज आणि ओटीटी यांचा लहान मुलांवर होत आहे विपरीत परिणाम ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

चित्रपटांसाठी परिनिरीक्षण मंडळ आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादांमध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही तिचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.

‘लेट्स चेंज’ या चित्रपटातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार स्वच्छतेचे धडे !

केंद्रशासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्यामुळे हा चित्रपट पहाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे.

कलाकार, नाट्यक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार ! – प्रिया बेर्डे, अध्यक्षा, भाजप सांस्कृतिक आघाडी

कोरोनाच्या संसर्गानंतर कला, नाट्य क्षेत्रात काम करणार्‍या तंत्रज्ञ यांसह अनेकांची स्थिती गंभीर झाली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध न होणे, पुरेसे खेळ न मिळणे यांसह अन्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सांगलीसह अनेक शहरातील नाट्यगृहांची अवस्था चांगली नाही.

अमेरिकेतील अभिनेत्रीचे चुंबन घेतल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवन याच्यावर टीका !

नीतीमत्तेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आणि असे कृत्य करून भारताची मान खाली घालायला लावणार्‍या अशा कलाकारांच्या चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !

सलमान खान याला मारण्याची धमकी देणार्‍या राम बिश्‍नोईला अटक !

धमकीचे ई-मेल पाठवणार्‍या राम बिश्‍नोईला जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने ‘जेव्हा सलमानची सुरक्षा हटवली जाईल, तेव्हा तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल’, अशी धमकी दिली होती.

सेन्सॉर बोर्डामध्ये चारित्र्यवान, धार्मिक वृत्तीचे आणि नीतीमान सभासद असणे आवश्यक !

दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांमध्ये अश्‍लील अन् मारामारीची हिंसक दृश्ये दाखवण्यात येतात. त्यामुळे गुन्हे आणि बलात्कार वाढले आहेत. अशा वासनांध दृश्यांचा परिणाम मुले आणि तरुण यांवर होतो.

चित्रपटात नॉर्वेविषयी दाखवलेले तथ्य चुकीचे ! – हंस जेकब फ्रेडनलिंड, नॉर्वेचे राजदूत

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर भारतातील नॉर्वेचे राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ‘ही केवळ काल्पनिक कथा आहे. या चित्रपटात नॉर्वेच्या प्रशासनाशी संबंधित गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.

सलमान खान याला प्रसिद्धीसाठी नाही, तर उद्देशाने मारणार आहोत ! – कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई

एक कुख्यात गुंड कारागृहात असतांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देतो, असे केवळ भारतातच घडू शकते !

नाटू नाटू !

चित्रपट हे जागृतीचे उत्‍कृष्‍ट माध्‍यम आहे. त्‍याचा योग्‍य वापर करण्‍याची कला आणि बुद्धी असणे आवश्‍यक आहे. कोणत्‍याही चांगल्‍या विचारांच्‍या चित्रपटाला लोक प्रतिसाद देतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार !

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता.