‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार !

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय माहितीपटालाही मिळाला ऑस्कर !

लॉस एंजलिस (अमेरिका) – येथे आयोजित ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता.

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्कार

भारतीय माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्कार मिळाला.

कार्तिकी गोन्साल्विस यांनी याचे दिग्दर्शन, तर गुनीत मोंगा यांनी निर्मिती केली आहे. यापूर्वी गुनीत मोंगा यांच्या ‘पिरियड अँड ऑफ सेंटन्स’ या माहितीपटाला वर्ष २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला होता.