सेन्सॉर बोर्डामध्ये चारित्र्यवान, धार्मिक वृत्तीचे आणि नीतीमान सभासद असणे आवश्यक !

सेन्सॉर बोर्डात (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळामध्ये) भ्रष्ट आणि लाचखोर सभासद लाच घेऊन कुठल्याही चित्रपटाला मान्यता देतात. दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांमध्ये अश्‍लील अन् मारामारीची हिंसक दृश्ये दाखवण्यात येतात. त्यामुळे गुन्हे आणि बलात्कार वाढले आहेत. अशा वासनांध दृश्यांचा परिणाम मुले आणि तरुण यांवर होतो. तेव्हा सेन्सॉर बोर्डामध्ये चारित्र्यवान, धार्मिक वृत्तीचे आणि नीतीमान असे सभासद असणे, हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा या संदर्भात सरकारने योग्य ती काळजी घ्यावी. – प्रभाकर दिगंबर गोरे (साभार : मासिक हिंदूबोध, एप्रिल २०१५)