सलमान खान याला मारण्याची धमकी देणार्‍या राम बिश्‍नोईला अटक !

अभिनेता सलमान खान याला धमकीचे ई-मेल पाठवणारा राम बिश्‍नोई

मुंबई – चित्रपट अभिनेता सलमान खान याला धमकीचे ई-मेल पाठवणार्‍या राम बिश्‍नोई नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाला जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने ‘जेव्हा सलमानची सुरक्षा हटवली जाईल, तेव्हा तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल’, अशी धमकी दिली होती.

गेल्या आठवड्यात सलमान खानचे व्यवस्थापक जॉर्डी पटेल यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या मेलमध्ये धमकी देऊन पुढे ‘प्रकरण बंद करायचे असेल, तर बोलायला सांगा. समोरासमोर बोलायचे असेल, तर तेही सांगा. आता वेळेत सांगितले आहे. पुढच्या वेळी केवळ झटका दिसेल’, असेही म्हटले आहे.