बंगालमध्ये श्रीरामनवमीनिमित्त भाजपने उभारलेल्या मंडपाची अज्ञातांकडून तोडफोड

बंगालमधील बर्धमान येथे भाजपच्या श्रीरामनवमी उत्सवासाठी बांधलेल्या मंडपाची काही अज्ञात व्यक्तींनी २५ मार्चला रात्री तोडफोड केली. या तोडफोडीच्या वेळी मंडपात उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण …..

साधकांनो, श्रीरामनवमीच्या निमित्ताने सर्वार्थांनी आदर्श असलेल्या प्रभु श्रीरामाचे गुण अंगी बाणवून अंतरातील रामराज्याची अनुभूती घ्या !

प्रभु श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणतात. प्रजेनेही प्रभु श्रीरामाने घालून दिलेल्या सर्व मर्यादांचे तेवढ्याच भावाने पालन केले; म्हणून ती प्रजाही आदर्श होती आणि म्हणूनच रामराज्यही आदर्श होते.

जळगाव, धुळे, नंदुरबार येथे सामूहिक गुढीपूजन !

चोपडा येथे हिंदु नववर्षाची स्वागतफेरी काढून चौकाचौकात सामूहिक गुढीपूजन करून गुढीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदु धर्माभिमानी कैलास व्यास यांनी सपत्नीक सामूहिक गुढीचे पूजन केले.

मुंबई येथे ढोलताशे आणि शोभायात्रा काढून उत्साहात गुढीपाडवा सण साजरा !

गिरगाव आणि दहिसर येथे सकाळपासूनच शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रांमध्ये पारंपरिक पोषाखासह भगवे झेंडे, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे, रांगोळ्या यांच्यासमवेत ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, असे वातावरण सर्वत्र होते.

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीने नववर्ष शोभायात्रांत विविध ठिकाणी सहभाग घेऊन केला हिंदु संस्कृतीचा जागर !

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांत समितीने सहभाग घेऊन हिंदु संस्कृतीची महानता समाजाला सांगितली.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजनाचे आयोजन !

शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली. वर्तकनगर येथेही समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली.

पुस्तकांपेक्षा सणांमध्ये आपला सांस्कृतिक इतिहास ! – डॉ. रामचंद्र देखणे

ग्रामदेवतेच्या प्रांगणात गुढी उभारणे, ही आपली प्राचीन परंपरा आहे. ब्रह्मदेवाने विश्‍वनिर्मिती केली आणि माणसाने आचरण कसे करावे, हे सांगितले. आपल्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत की, त्या घटनांनंतर विजयाची गुढी उभारण्यात आली आहे.

‘प्रतीवर्षीप्रमाणे उत्तम रितीने पार पडलेला महाशिवरात्रीचा देखणा सोहळा !’ – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

‘प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही घरातील महाशिवरात्र अत्यंत शांत चित्ताने पार पडली. प्रतीवर्षी मनुष्यबळ भरपूर असे; पण यंदा आम्हाला काळजी होती ती सेवकांची.

सातारा जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गुढीपूजन करून नववर्षाचे उत्साहात स्वागत !

जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने हिंदु धर्मानुसार गुढी उभारून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची शपथ घेण्यात आली.

संभाजीनगर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था सहभागी !

संभाजीनगर येथे हिंदु नववर्षानिमित्त समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. विविध संघटनांचे सजीव देखावे सदर करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली तर सनातनचा बालककक्ष उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now