पंजाबमध्येही हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
लुधियाना (पंजाब) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड केली. प्रशासनाने हिंदूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदु संघटनांनी प्रशासनाला कारवाईसाठी ७२ घंट्यांचा अवधी दिला आहे.
लुधियाना (पंजाब) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड केली. प्रशासनाने हिंदूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदु संघटनांनी प्रशासनाला कारवाईसाठी ७२ घंट्यांचा अवधी दिला आहे.
हावडा (बंगाल) जिल्ह्यातील ब्रांका येथे हिंदूंच्या ५ मंदिरांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे.
अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.
निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्या आश्वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे. त्याद्वारे ‘राजकीय पक्षांना आश्वासने कशी पूर्ण केली जाणार आहेत ?’, ‘त्यासाठी किती निधी लागणार आहे ?’, याची माहिती द्यावी लागणार आहे.
आसाम सरकारने ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित केला आहे. ‘आता राज्यातील सर्व विवाह ‘विशेष विवाह कायद्यां’तर्गत होतील. हा निर्णय बालविवाह बंद करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे’, असे सरकारचे म्हणणे आहे.
अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.
कर्नाटक सरकारने नुकतेच संमत केलेल्या विधेयकानुसार हिंदु मंदिराचा महसूल १ कोटी रुपये असेल, तर सरकार त्यावर १० टक्के कर आकारू शकते. तसेच या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये इतर धर्मातील सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
मालदा (बंगाल) येथील ‘आदिना’ मशीद परिसरात काही हिंदूंनी पूजा केल्यावर भारतीय पुरातत्व विभागाने गुन्हा नोंदवला. ही मशीद काही शतकांपूर्वी आदिनाथ मंदिर पाडून बांधण्यात आली आहे. येथे अद्यापही देवतांच्या मूर्ती आणि खंडित शिवलिंग आहे.
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.
संभल (उत्तरप्रदेश) येथे ५०० वर्षांपूर्वी भगवान कल्कि यांचे मंदिर होते; मात्र बाबराने ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली, त्याप्रमाणेच येथेही कल्कि मंदिर पाडून तेथे शाही जामा मशीद बांधण्यात आली.