विद्यार्थ्यांना साधना न शिकवल्याचा दुष्परिणाम !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील कृष्णा विद्या शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने वर्गात शिक्षक सचिन त्यागी सर्वांसमोर रागवल्याचा सूड घेण्यासाठी त्यांच्यावर शाळेच्या आवारातच गोळीबार केला. यात शिक्षक सुदैवाने बचावले.

तृणमूलचे हुकूमशाह मंत्री ओळखा !

ज्या भागात मला मते मिळणार नाहीत, त्या भागातील लोकांना पाणी आणि वीज मिळणार नाही, अशी धमकी बंगालचे कृषीमंत्री तपन दासगुप्ता यांनी हुगळी येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रसारसभेमध्ये जनतेला दिली.

भारताने पाकव्याप्त काश्मीर नियंत्रणात घ्यावा !

‘आता आम्हाला पाकसमवेत रहायचे नाही. आम्हाला भारतात विलीन व्हायचे आहे’, अशी घोषणा पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एका सभेमध्ये केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

अशा पक्षांवर बंदी घाला !

बंगालमधील बारिऊपूर येथे ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ या राजकीय पक्षाच्या जियारूल मोल्लाह या कार्यकर्त्याच्या घरातून पोलिसांनी बॉम्ब, शॉटगन आणि बॉम्ब बनवण्याचे यंत्र जप्त केले.

विदेशी संस्थांकडून होणारी भारताची अपकीर्ती जाणा !

अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये भारतात नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

धर्मांध ख्रिस्त्यांची अरेरावी जाणा !

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील इदलापाडूमध्ये सीतामातेच्या पदचिन्हांच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विशाल क्रॉस उभारण्यात येत असल्याने पदचिन्हांना हानी पोचवण्यात आली आहे.

भारतात भ्रष्ट राजकारण्यांना अशी शिक्षा होईल का ?

फ्रान्सचे ६६ वर्षीय माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

निवडणूक आयोग तृणमूल काँग्रेसवर कारवाई कधी करणार ?

जर राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार आले, तर इमाम आणि मौलवी यांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्‍वासन तृणूमल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी एका मशिदीमध्ये निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी दिले.

धर्मांधांकडून होणारी दिशाभूल जाणा !

हिंदू आरोप करतात की, मुसलमान त्यांची लोकसंख्या वाढवून भारतावर नियंत्रण मिळवू इच्छितात; मात्र मुसलमान कधीही हिंदूंच्या लोकसंख्येच्या पुढे जाऊ शकणार नाहीत, असा दावा निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त कुरेशी यांनी केला.

निधर्मी ‘आप’ची धर्मांधता जाणा !

देहली दंगलीच्या प्रकरणी राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार आणि ‘खालसा’ या संघटनेने मुसलमान पीडितांना पुरेपूर साहाय्य केले, तर पीडित हिंदूंना साहाय्य देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.