नवाब मलिक यांच्या मालमत्ता ‘ईडी’कडून कह्यात !

आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या काही मालमत्ता आर्थिक घोटाळ्यातील पैशांतून खरेदी केलेल्या आहेत ! – अंमलबजावणी संचालनालय

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नुकत्याच कह्यात घेतलेल्या मालमत्ता या आर्थिक घोटाळ्यातून जमवलेल्या काळ्या पैशांतून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने प्रवीण राऊत यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते या कटामागचे सूत्रधार (मास्टर माईंड) आहेत.

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांकडे देण्याची किरीट सोमय्या यांची ‘ईडी’कडे मागणी !

आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतलेला सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना हानी झालेल्या शेतकऱ्यांच्या कह्यात द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा नोंद !

मेधा पाटकर यांनी अनेक विकास प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना कोण देणग्या देते, त्यांचे कामकाज कसे चालते, याविषयीची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे.

खासदार संजय राऊत यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त !

यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांची दादर येथील १ सदनिका, तसेच रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड कह्यात घेतले.

खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

संजय राऊत यांची येथील १ सदनिका आणि रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड अशी एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे.

माढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ‘ईडी’कडून चौकशी !

आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. संपूर्ण प्रकरणात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ‘ईडी’कडे तक्रार केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा ‘ईडी’कडून ताबा घेण्याची शक्यता !

राज्य सहकारी अधिकोषाने अनेक आजारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज प्रकरणांविषयी ‘ईडी’ सध्या अन्वेषण करत आहे. राज्य सहकारी अधिकोषाच्या ७६ संचालकांवर अशा चुकीच्या कारभाराविषयी ‘ईडी’ची नजर आहे.

नागपूर येथील अधिवक्ता सतीश उके यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली संपत्ती हडपली आहे, असा आरोप अधिवक्ता उके यांच्यावर आहे. ‘ईडी’ने अधिवक्ता उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीक उके यांना कह्यात घेतले आहे. याआधी नागपूर गुन्हे शाखेने यापूर्वी या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते.