पंजाबमधील काँग्रेसच्या उमेदवारांसमवेत राहुल गांधी सुवर्ण मंदिरात !

पंजाबमधील काँग्रेसच्या उमेदवारांसमवेत राहुल गांधी सुवर्ण मंदिरात !

निवडणुका चालू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मंदिर आणि गुरुद्वारा यांमध्ये जाण्याचे ‘पर्यटन’ चालू !

निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

मतदारांना लाच देणे यांची सूची न संपणारी ! विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?

निवडणुकीच्या काळात मतदारांना विनामूल्य गोष्टी देण्याच्या आश्‍वासनांच्या विरोधात जनहित याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.

काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर घेतली शपथ

काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर घेतली शपथ

स्वार्थासाठी पक्षांतर करणारे पक्षद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही असतात, हे खरे; पण ‘गोव्यात सुराज्य आणू’, अशी शपथ घेतली असती, तर ते जनतेला अधिक आवडले असते !

उत्पल मनोहर पर्रीकर यांची भाजपला सोडचिठ्ठी : पणजी मतदारसंघातून अपक्ष या नात्याने निवडणूक लढवणार

उत्पल मनोहर पर्रीकर यांची भाजपला सोडचिठ्ठी : पणजी मतदारसंघातून अपक्ष या नात्याने निवडणूक लढवणार

माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २ कोटी ४४ लक्ष रुपयांचे साहित्य कह्यात !

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २ कोटी ४४ लक्ष रुपयांचे साहित्य कह्यात !

अवैध मद्य, अमली पदार्थ आणि किमती वस्तू यांचा समावेश

गोव्यातील भाजपच्या उमेदवारांच्या सूचीतील ५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे अदखलपात्र गुन्हे नोंद

गोव्यातील भाजपच्या उमेदवारांच्या सूचीतील ५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे अदखलपात्र गुन्हे नोंद

५ पैकी २ उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना ५ किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

देहू (जिल्हा पुणे) नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता !

देहू (जिल्हा पुणे) नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता !

पुण्यातील देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. भंडारा उधळून, फटाके फोडून, ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

महाविकास आघाडीचे ५७ नगरपंचायतींवर वर्चस्व, तर भाजपकडे २४ नगरपंचायती !

महाविकास आघाडीचे ५७ नगरपंचायतींवर वर्चस्व, तर भाजपकडे २४ नगरपंचायती !

राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल २० जानेवारी या दिवशी घोषित होणार आहेत.