|

पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) : गोव्यात १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आजपर्यंत अवैध मद्य, अमली पदार्थ आणि वस्तू मिळून एकूण २ कोटी ४४ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेण्यात आले आहे. गोव्यात ८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, ‘‘कह्यात घेतलेल्या साहित्यामध्ये १ कोटी ९८ लक्ष रुपये किमतीचे मद्य, २८ लक्ष ७५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ, १० लक्ष ५४ सहस्र रुपये किमतीच्या विशेष भेटवस्तू, ४ लक्ष ३९ सहस्र रुपये रोकड आणि २ लक्ष रुपये किमतीचे सोने आदी मौल्यवान वस्तू यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई या नात्याने कह्यात घेतले आहे, तर ६ गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आणि अन्य १०१ जणांवर निरनिराळ्या स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.’’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी
छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !