#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !

जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !

#Gudhipadva : प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !

उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गुढत्व दर्शवते.

#Gudhipadva : जाणून घ्या ! गुढीचे विशेष महत्त्व

गुढी लावल्याने वातावरणातील प्रजापति संयुक्‍त लहरी या कलशरूपी सूत्राच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे, म्हणजे प्रजापति लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति लहरी आपल्याला प्राप्त होतात.

#Gudhipadva : जाणून घ्या पंचांगातील गुढीपूजन करतांनाचा ‘देशकाल’ !

कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.

#Gudhipadva : गुढीपाडव्याला कोणती प्रार्थना करावी ?

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !

#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व !

सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे.

#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा ! या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ग्रंथप्रदर्शन अन् विविध माध्यमांतून करण्यात आला धर्मप्रसार !

एका शिव मंदिरामधील पुजारी श्री. कालुदासजी वैष्णव म्हणाले, ‘‘अनेक लोकांना भगवान शिवाशी संबंधित पूजेविषयी माहिती नाही. तुम्ही हे भित्तीपत्रक लावून फार चांगले कार्य केले.’’

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !

अन्नाची नासाडी टाळा आणि पर्यावरण वाचवा !

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते. हे प्रमाण जगातील एकूण अन्न उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे.